जे प्रतिशब्द शोधायला मला थोडाफार त्रास झाला त्यांची यादी मुख्यत: माझ्या स्वतःच्या सोयीसाठी केलेली आहे. हे शब्द, त्यांचे स्पेलिंग, ऱ्हस्वदीर्घ / शुद्धलेखन बिनचूक असेलच असे नाही. ह्या शब्दांचा वापर केला त्यावेळी त्या संदर्भात तो वापर योग्य वाटला, इतकेच. शब्द कोणत्या कोशातून घेतले आहेत हेही नोंदविणे शक्य झालेले नाही. केवळ शब्द शोधणे सुकर व्हावे म्हणून ते ऑनलाइन टाकीत आहे. ह्या शब्दांमधील चुका निदर्शनास आणल्यास अथवा ते इतरत्र कोठे उपलब्ध आहेत हे कळविल्यास जाणकारांचा मी ऋणी राहीन. अ ते ज्ञ आणि a to z असे त्यांचे अकारविल्हे वर्गीकरण केलेले आहे. ह्या प्रतिशब्दांचा वापर करायचा झाल्यास तो पूर्ण पडताळणीनंतरच करावा कारण हे प्रतिशब्द प्रत्येक संदर्भात योग्य असतीलच असे नाही.
अरे वा . छानच.
ReplyDelete